आपल्या देशातले खूप आध्यात्मिक गुरू, बाबा, देव्या अध्यात्मावर बोलतात. विज्ञानावर टीकेची झोड उठवतात. विज्ञानाची खिल्ली उडवतात. पण त्यांना माणसाच्या मेंदूच्या (brain) कार्यपद्धतीची धड माहिती नसते. मानसोपचार शाखेमधली (psychiatry) नवी संशोधनं माहीत नसतात. जगातल्या साऱ्या जादूविद्या , पिशाच्चविद्या, चेटूकविद्या (witch craft alchemy: black megic) त्राटकविद्या, सर्व धर्माच्या ध्यानधारणेच्या पद्धती, योगशास्त्र या सर्वांच्या अभ्यासातून निर्माण झालेल्या योगशास्त्र या विषयाची धड माहितीही नसते. त्यामुळे त्यांच्याच क्षेत्रातल्या खूप प्रश्नांची उत्तर आधीच विज्ञानाचे शोधली आहेत याची पुसटशी कल्पनासुद्धा नसते. बालून या प्रकारचा, अंधश्रद्धा पसरवणारा फार मोठा वर्ग निर्माण झाला आहे. या जगात कुणाला सिद्धी वगैरे प्राप्त झालेली नसते. जो जो सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा करतो, तो तो लोकांना लुबाडण्यासाठी असला दावा करीत असतो, हे आपण समजून घेतले पाहिजे. सिद्धीच्या नावावर जे चमत्कार केले जातात किंवा सांगितले जातात ते सारेच्या सारे खोटे असतात. बनवाबनवीचा भाग असतो.
Reviews
There are no reviews yet.