बुवाबाजी : बळी स्त्रियांचा

198.00

Out of stock

पुस्तकाचे नाव बुवाबाजी : बळी स्त्रियांचा
लेखक श्याम मानव
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २१६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २४९ ग्रॅम

Description

अंधश्रद्धांचा आणि लैंगिक समस्येचा अगदी जवळचा संबंध आहे. समाजातील बुवाबाजी सर्वार्थानं दूर व्हायची असेल, बुवाबाजीच्या क्षेत्रात होणारं स्त्रियांचं यौन शोषण खरंच थांबवायला हवं असेल, तर आजची समाजातील पुरुषप्रधान दुटप्पी नैतिकता बदललीच पाहिजे. त्याशिवाय या समाजातलं बुवांचं यौनतृप्तीचं प्रयोजन संपणारच नाही.
आपणास समाजातून बुवा हटवायचे असतील तर सर्वसामान्य जनतेचं लैंगिक शिक्षण व्हायलाच हवंय. एवढंच नव्हे तर आजच्या काल्पनिक लैंगिक नैतिकतेच्या कल्पना बऱ्याचशा शिथिल व्हायला हव्यात, तरच बुवांच्या मार्फत होणारं, मांत्रिकांच्या मार्फत होणारं भारतीय स्त्रियांचं यौन शोषण थांबू शकेल. अर्थात या यौन शोषणाला बळी ठरण्यामागे कामतृप्तीच्या समस्येसोबतच अंधश्रद्धांचा प्रभावी पगडा हा सर्वाधिक कारणीभूत ठरतो. या अंधश्रद्धांचं प्रचंड मोठं जोखड या स्त्रियांच्या मानगुटीवर नसतं, तर कदाचित केवळ काम अतृप्तीमुळे एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रिया बुवा मांत्रिकांना फशी पडल्या नसत्या.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बुवाबाजी : बळी स्त्रियांचा”

Your email address will not be published. Required fields are marked *