Description
भारतात सद्यस्थितीत ‘मानसशास्त्राची ओळख, मानसशास्त्राचे’ महत्त्व अधोरेखित होत आहे. साहजिकच या क्षेत्रातील ‘व्यक्तिवर्तन’ हा केंद्रबिंदू ठेवून प्रस्तुत विषयाचे विवेचन करण्यात आलेले आहे. हे करताना विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंतचे संशोधन संदर्भ लक्षात घेऊन केलेले लेखन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ‘मानसशास्त्राची ओळख’ हे पुस्तक ई-बुक म्हणून प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या विषयावर मराठीतून मोजकीच पुस्तके उपलब्ध असताना एक नवीन ई-बुक प्रकाशित करताना विद्यार्थी, शिक्षक व या विषयाच्या अभ्यासकांच्या अध्ययन सुविधेत मोलाची भर घातली आहे. पुणे, कोल्हापूर, अमरावती व नांदेड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले हे ई-बुक या विद्यापीठांच्या कक्षेबाहेरील सामान्य वाचकांनाही एक संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. ‘मानसशास्त्राची ओळख’ ही मानसशास्त्राची एक उपयोजित शाखा असल्याने मूळ मानसशास्त्रीय सिद्धांताचे या ई-बुक मध्ये आवश्यक तेथे स्पष्टीकरण केलेले आहे. त्यामुळे यातील प्रश्न समजून घेणे नक्कीच सोपे होईल. विसाव्या शतकाच्या आरंभी उदय झालेल्या या शाखेतील संशोधनाने मानसशास्त्राच्या पारंपरिक अद्ययावत उपशाखेपर्यंत केलेल्या आकाशभरारी बोधप्रद तसेच औद्योगिक चित्रण या ई-बुकमध्ये केलेले आढळेल. हे सर्व वाचकांपर्यंत पोहोचवत असताना लेखक व प्रकाशक मनस्वी समाधान व्यक्त करीत आहेत तसेच त्यांच्याकडून येणार्या प्रतिक्रिया व सूचनांचे आम्ही स्वागत करत आहेत.
– प्रा. डॉ. दिलीप शिवणे
Reviews
There are no reviews yet.