Description
निरभ्र रात्री आकाशात अगणित चांदण्या चमकतात. काही मिणमिणतात. काही लुकलुकतात, तर काही स्तब्ध असतात. आपण माणसे अगदी असेच आहोत; काही गंभीर तर काही हसतमुख. रात्र झाली की चांदण्या आकाशात उगवतात आणि दिवस उगवायच्या आत मावळतात, दिसेनाशा होतात मग त्यात जातात कुठे? कुठे लपून बसतात. असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर कोण देणार त्याचे उत्तर आहे. या छोट्याशा पुस्तकात. हे सारे तारे उतरतात या धर्तीवर, जमिनीवर अगदी तुमच्या आमच्या नजरेत पण ते असतात वृक्षांच्या रूपात हे अगणित तारे नक्षत्र बागेत लावणार कसे? हा ही एक प्रश्नच आहे. पण ते सर्व काही नक्षत्र बागेत उतरत नाहीत. एकूण नक्षत्र आहेत 28 आणि राशी 12 आणि ग्रह 12 म्हणजे एकूण 52. नक्षत्र तार्यांची संख्या वेगळी असते आणि ते तारे एकमेकांच्या संगतीने दिवसभर आपल्या सोबत राहतात. तुमच्या आमच्यावर प्रभाव पाडतात. हे कसे? याचे उत्तर याच पुस्तकात सापडेल मग शोधा बरे आपला नक्षत्र वृक्ष कोणता?
Reviews
There are no reviews yet.