Description
भगवान बुद्धांकडे पाहण्याचे ढोबळमानाने दोन प्रकार दिसून येतात. पहिल्या प्रकारात त्यांना एक अवतारी व चमत्कारी पुरुषाच्या रूपात अतिशयोक्तिने भरलेल्या असंख्य शब्दांनी साहित्यात प्रस्तुत केले, परंतु असे रूप सर्वात प्राचीन विश्वसनीय मुळ ऐतिहासीक पुराव्या पासून फारकत घेताना दिसून येते. मात्न दुसऱ्या प्रकारात मुळ त्रिपिटकात बुद्धाच्या चमत्कारीक जीवन चरित्रांपेक्षा त्यांच्या मुख्य शिकवणीचे वर्णन अधिक विस्ताराने, गंभीर तत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेले आहे असे आढळून येते, आणि ही गोष्ट अपेक्षितच आहे, कारण असे उपदेश त्यांच्या वास्तव ज्ञानाचा केंद्रबिंदू होत्या व आहेत, परंतु इथे मात्र तथागत भगवान बुद्धांच्या वैयक्तिक जीवनाचे वर्णन खुपच अल्प पण वास्तववादी स्वरुपात दिसून येते. प्रस्तुत ग्रंथात ‘आद. भन्ते श्रावस्ती धम्मिका’ यांनी भगवान बुद्धांना असामान्य पण वास्तववादी ऐतिहासिक मानवी पुरुष म्हणून त्यांच्या जीवनाचे, त्यांच्या दैनंदिनीचे, त्यांचे चालणे, बोलणे, वागणे, मिश्किल विनोद करणे तसेच, त्यांनी मध्यदेशात केलेला प्रवासाचे, त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तिरेखांचे अतिशय अभ्यासपूर्ण व विविध संदर्भासहित चरित्न मांडणी केली आहे. परिणामी, या पुस्तकातून बुद्धांचे एक वेगळे आणि अत्यंत रोचक असे चित्न समोर येते जे प्रचलित समजुतींपेक्षा पूर्णतः वेगळे आहे



Reviews
There are no reviews yet.