Description
विठ्ठल रामजी हे बहुआयामी प्रतिमेचे कर्मयोगी नेते होते. नेतृत्त्वाच्या ‘अंतरी निर्मत्सर’ अशा अत्यंत दुर्मिळ व निर्विष कोटीत न्या. म. गो. रानडे आणि म. वि. रा. शिंदे यांचा समावेश करावा लागेल. त्या दोघांना प्रार्थना समाजाच्या परिपक्वतेचे अष्टपैलू मानदंड म्हणता येईल. म. शिंदे हा महाराष्ट्रातील सर्वांगीण सुधारणावादाचा खऱ्या अर्थाने सुवर्णमध्य होता. सर्व प्रकारची टोके टाळत आणि सर्वांतील ग्राह्यांशाची जाण बाळगत त्यांनी आपली वाटचाल केली. ते बहुजन दृष्टीचे सर्वजनहितवादी होते. काही समन्वयवादी बिळबिळीत व निसरडे असतात. ते कृतक समन्वयवादी असतात. पण काही मोठे कसदार आणि धारदार असतात. शिंदे त्या प्रकारचे होते. त्यांचा समन्वयवाद दिशाहीन तर नव्हताच; उलट तो दिशाशोधक व दिशादर्शक होता. तो कृतक नव्हता, तर सम्यक होता. पण म. शिंदे यांचे महत्त्व ना प्रार्थना समाजाला समजले, ना महाराष्ट्राला उमगले !
Reviews
There are no reviews yet.