Description
हिटलरने जेव्हा रशियावर चढाई केली त्यावेळी अण्णा वाटेगावीच होते. या लढाईच्या बातम्या ते मुंबईहून येणाऱ्या लोकांना विचारत असत. या लढाईकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. त्यावेळी सातारा जिल्हा बंडाच्या दणक्याने हादरत होता. शेवटी अण्णांना गावी रहाणे कठीण झाले. ते बेचाळीस सालच्या जून महिन्यात मुंबईला गेले. ते नायगावला कोहीनूर मिलमध्ये काम करु लागले. त्यावेळी नुकतीच लढाई हातघाईवर येत होती. तिचा लाल रंग चढत होता. अण्णा मुंबईत आले. वर्तमानपत्रातून सोव्हिएत रशियांच्या पराक्रमाबद्दल वाचून त्यांना स्फूर्ति मिळाली. शिवाय त्यांच्या काही मित्रांनी त्यांना सूचना केली, ” अहो शाहीर, जर तुम्हाला लिहायचे असेल तर रशिया जर्मनवर गंमत म्हणून तरी लिहा ” याचवेळी अण्णांनी रटालिनचा पोवाडा लिहिण्यास सुरवात केली व दोन महिन्यात पोवाडा लिहून तयार केला.
Reviews
There are no reviews yet.