Description
फ्रेंच रसायनशास्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्रज्ञ लुई पाश्चर यानं आपल्या संशोधनानं हवेतल्या धुळीत अब्जावधी सूक्ष्मजीव असतात हे त्यानं सिद्ध केलं. सूक्ष्मजंतूंपासून होणारे रोग, त्यांची कारणं आणि त्यावरचे उयाय शोधणारा संशोधक म्हणून आज त्याला संपूर्ण जग ओळखतं. पाश्चारणं’ ‘निर्जंतुकीकरण’ ( पाश्चारायझेशन) ची पद्धत शोधली. दारू रेशमाचे किडे, गुराढोरांवर पडणारा रोग यावर केलेल्या संशोधनानं पाश्चरणं उद्योगधंद्यांनाही नवसंजीवनी दिली. कुत्र्याच्या चावण्यानं होणाऱ्या रेबीजसारख्या महाभयंकर रोगावर उपाय म्हणून परिणामकारक लस शोधण्याचं कामही त्यानं केलं. त्यासाठी पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडात नळी खुपसून ती लाळ शोषून जीवावर बेतन्याचं महाभयंकर धाडस पाश्चरणं केलं. ” लोकांच्या टिकेला सामोरे जा. त्यामुळे खचून निराश न होता आपल्या निश्चयावर पक्के राहा. सगळ्या शंका निरसन होईपर्यंत वस्तुस्थिती तपासत राहा आणि स्वत:च्याच विचारांबद्दल पुन:पुन्हा शंका घेत राहा. प्रयोग करत राहा. आपल्या कामानं माणसाचं कल्याण होतंय असं तुम्हाला जेव्हा लक्षात येईल, त्या क्षणी एक अतीव समाधान तुम्हाला लाभेल” असं म्हणणाऱ्या पाश्चारला संशोधन करताना सूक्ष्म निरीक्षण आणि चिकाटी या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटत. पाश्चरची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की फ्रान्सनं श्रेष्ठ व्यक्तींची यादी करायची ठरवलं आणि त्यासाठी लोकमत घेतलं, तेव्हा पाश्चर हा पहिल्या क्रमांकावर तर नेपोलियन हा पाचव्या क्रमांकावर होता !
Reviews
There are no reviews yet.