Description
नोबेल पारितोषिकानं गौरवलेला अलेक्झांडर फ्लेमिंग हा एक महान ब्रिटिश सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ होता. खरं तर त्याच्या पेनिसिलीनच्या शोधामुळे वैद्यकशास्त्रात प्रतिजैविकांचं (एन्टीबॉयोटिक्सचं) युगच चालू झालं आणि अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणं शक्य झालं. ‘पेनिसिलीनचा जनक’ म्हणून आख्खं जग अलेक्झांडर फ्लेमिंगला ओळखतं. ‘पेनिसिलीन निसर्गानंच तयार केलं होतं. मी फक्त ते शोधून काढलं’ असं विनम्रपणे अलेक्झांडर फ्लेमिंग म्हणे.
पेनिसिलीनच्या शोधाचं श्रेय नेहमी फ्लेमिंगला दिलं जायचं आणि त्याचंच कौतुक व्हायचं. पण फ्लेमिंगनं कधीही हे श्रेय एकट्यानं घेतलं नाही. ‘फ्लोरी आणि चेन या दोघांनी पेनिसिलिन वापरण्यायोग्य केलं नसतं तर आपण लावलेल्या शोधाचा काहीच उपयोग झाला नसता. त्यामुळे पेनिसिलीनचं खरं श्रेय फ्लोरी आणि चेन यांनाही मिळायलाचं हवं’ असा त्याचा नेहमीच आग्रह असायचा. त्यानं आपले मानसन्मान अत्यंत नम्रपणे स्वीकारले. जेव्हा पेनिसिलीनचा फायदा झालेला एखादा गरीब रुग्ण किंवा एखादा लहाना मुलगा त्याला कृतज्ञता व्यक्त करणारं पत्र लिहित असे, तेव्हा ते वाचून अलेक्झांडर भावनाविवश होत असे. शरीरातल्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीबद्दल त्याला प्रचंड आस्था होती आणि या विषयावर आयुष्याच्या अखेरपर्यंत तो संशोधनही करत राहिला.
Reviews
There are no reviews yet.