Description
जागतिक किर्तीचे सोनेरी पान’ या माझ्या पुस्तकात मी बाबासाहेबांच्या १८९१ ते १९५६ पर्यंतच्या जीवनप्रवासातील तसेच त्यांच्या महापरिनिर्वाणा नंतरच्याही काही उल्लेखनीय घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अस्पृश्य जातीत जन्मास येवूनही बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले बाबासाहेब यांनी आपल्या बुद्धिकौशल्यांच्या सामर्थ्यांवर देशात तसेच विदेशात उच्चविद्याविभूषित पदव्या संपादित केल्या. सामाजिक व राजकीय कार्यात सक्रीय झाल्यानंतर अस्पृश्य घटकांबरोबरच शेतकरी, शेतमजूर, कामगार महिला वर्गासाठी महत्वाचे योगदान दिले. अस्पृश्य जनतेच्या स्वातंत्र्य, स्वावलंबन व बंधमुक्ततेसाठी अनेक सत्याग्रह करुन ते यशस्वी केले. अस्पृश्यांच्या उद्घारासाठी व अस्पृश्यता निवारणासाठी अस्पृश्य परिषदांना उपस्थिती लावून त्यांच्या सामाजिक व राजकीय हक्कांचे समर्थन केले. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने जाती, धर्म, लिंग, जन्म किंवा इतर कोणताही भेदभाव न करता ‘भारतीय संविधाना ‘त महत्वाची भूमिका बजावली. तर दलितांच्या उद्घारासाठी आयुष्याच्या उत्तरार्धात हिंदू धर्माचा त्याग करुन आपल्या अनुयायांसह तर्कशुद्ध, विज्ञानवादी अशा बौद्ध धर्माचा स्विकार करुन भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे ‘धम्मचक्र’ पुन्हा गतीमान केले.

Reviews
There are no reviews yet.