Description
शिक्षणाचा प्रसार करणारे ध्येयवादी शिक्षक, कार्यक्षम मुख्याध्यापक तथा दूरदृष्टीसे संस्थाचालक किसन वराडे यांचे ‘सरवा’ हे आत्मकथन मराठी साहित्यविश्वाला समृद्ध करणारे आहे. भाषा, अनुभव, आणि जीवनसंघर्ष या साऱ्याच बाबतीत हे उजवे आहे. मराठी साहित्यात आत्मकथनांची खंडित होऊ पाहणारी परंपरा हे लेखन प्रवाहित करील अशी आशा आहे.
‘बलुतं’, ‘उपरा’, ‘उचल्या’ ते ‘आमचा बाप आन आम्ही’ यासारख्या अनेक आत्मकथनांचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर झाला आहे. या मालेत लेवा पाटील समाजाचं प्रतिनिधित्व करणारं हे आगळं – वेगळं आत्मकथन आहे. या पार्श्र्वभूमीवर किसन वराडे यांचा प्रवास काहीचा वेगळा असला तरी शिक्षणाची आस मात्र तीच आहे. खरेतर शिका, संघटित व्हा. . . हेच सूत्र यामागे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलित माणूस जागा करायचा नव्हता तर संपूर्ण दलितेतर बहुजन समाजही जागृत करायचा होता. हे आत्मचरित्र वाचतांना हा समस्त बहुजन समाज आता जागृत झाला आहे याची खात्री पटते.
सध्या आपण जागतिकीकरणात उभे आहोत. या काळात साहित्य, संस्कृती, शिक्षण याशिवाय जीवनाची सर्व अंगे बदलत आहेत. अशा आधुनिक काळात मानवी जगण्यातल्या उच्चतम ध्येयवादाचे दिशादर्शन हे आत्मकथन करते. नव्या पिढीसाठी हे फार महत्त्वाचे आहे.
Reviews
There are no reviews yet.