Description
लावायला बापाचं नाव नाही म्हणून तिथं किशोर आईचं नाव लावतो. त्याच मायेचा दुसरा लेक, दीपक आजोबांचं नाव बापाच्या जागी लिहितो ! आणि कोल्हाटी समाजातील ती माय मोठ्या मुश्किलीनं नाचण्याच्या धंद्यातून निसटून खरी; परंतु मानलेल्या नवऱ्याकडे राहू लागली तर तिच्या साऱ्या जीवनाचीच ससेहोलपट झाली…
येथे पुरुषमंडळी आयतं बसून खातात – पितात आणि त्यांच्या मायबहिणी त्यांची हौसमौज – खाणंपिणं भागविण्यासाठी नाचगाणं करतात…
मन विदीर्ण करून सोडील अशी मायलेकराची करुण कहानी …
Reviews
There are no reviews yet.