असंही जगणं असतं…! विश्व थॅलेसेमियाचे

270.00

10 in stock

पुस्तकाचे नाव असंही जगणं असतं…! विश्व थॅलेसेमियाचे
लेखक नदीम सय्यद
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २०८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २९० ग्रॅम

Description

माझ्या मुलाच्या  दुर्मिळ आजाराच्या निमित्ताने मला खुप काही अनुभवायला मिळालं. दिर्घ काळ वेगवेगळ्या हॉस्पीटलला भेट द्यावी, तिथे रहावं लागलं. मला वाटलं हा एक वेगळ्या वाटेवरचा प्रवास होता; जो असामान्य आहे. या प्रवासात मला अनेक सहप्रवासी भेटले. दु:ख, वेदनेच्या मोठमोठ्या पाट्या डोक्यावर घेवून चालणारे, मरणाची भीती व जीवनाच्या न पेलवणाऱ्या ओझ्याने वाकलेले, मृत्यूच्या छायेत असतानाही मनात सुर्य घेवून चालणारे, दुखा:च्या डोंगरावरून इतरांना दिशा दाखवणारे, भयानक व भीतीदायक परिस्थितीतही तेवढ्याच सशक्तपणे परिस्थितीशी झगडणारे, न डगमगता सर्व ताकदीनिशी लढणारे लढवय्येही मला याच प्रवासात भेटले.

या पुस्तकात मला रुग्णालयात भेटलेल्या रुग्णांची, त्यांच्या पालकांची जीवन कथा आहे. त्यांच्या खडतर प्रवासावर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न आहे. आयुष्य  काय असतं?, जीवन कशाला म्हणतात ?, सुख काय आहे ?, दु:ख काय ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रुग्णालयात खुप सहजतेने मिळतात. पुस्तकातील पात्र नक्कीच दु:खी आहेत, अस्वस्थ आहेत, एका अर्थाने नकारात्मक परिघात त्यांचा प्रवास चालू असला तरी तेवढीच सकारात्मक ऊर्जा परावर्तीत करण्याची ताकद या पत्रांमध्ये आहे. या पुस्तकात जे काही लिहीलयं ते खरचं असामान्य आहे. त्यांचं जग हे या जगापेक्षा खुप वेगळं आहे. या थॅलेसेमिक जगातील दु:ख, वेदना, दैनंदिन प्रश्न, जगण्यासाठीचा संघर्ष, जगणं मरणं सगळचं असामान्य आहे. या पुस्तकातील पात्रांना अनुभवल्यानंतर त्यांच्या व्यथा आणि वेदना समजल्यानंतर निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्या, ताणतणाव, शारीरिक व्याधी छोट्या वाटू लागतील. तुमचं आयुष्य कसं आहे, कसं चाललय ! हे तुमचे विचार ठरवतात. मला खात्री आहे की, या पुस्तकातील पात्रांना वाचल्यानंतर, त्यांना समजून घेतल्यानंतर तुमचं आयुष्य बदलणार आहे, कारण तुमचे बदलणार आहेत. शेवटी प्रकाश हा जळणाऱ्या दिव्याकडूनच मिळत असतो. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “असंही जगणं असतं…! विश्व थॅलेसेमियाचे”

Your email address will not be published. Required fields are marked *