तोत्तोचान

130.00

1 in stock

पुस्तकाचे नाव तोत्तोचान
लेखक तेत्सुको कुरोयानागी
ISBN 812372495-0
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १३०
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

”आता तू या शाळेची” मुख्याध्यापकांकडून ऐकल्यावर दुसऱ्या दिवशीची वाट पाहणं तोत्तोचानला कठीण झालं होतं. यापूर्वी कुठल्याच दिवसाची तिनं इतक्या उत्कंठेने वाट बघितली नसेल. छोट्या तोत्तोचाननं ‘तोमाई’मधील, जे वातावरण अनुभवलं होतं ते तिला आणि तिच्या सवंगड्यांना खूप आवडायचं. त्यांचे मुख्याध्यापक गणवेश आणि साचेबद्ध अभ्यासापेक्षा त्यांच्या चौरस आहाराला महत्त्व द्यायचे. मुलं संगीत शिकत, खेळात भाग घेत, शिबिराला जात, नाटक करत, मोकळ्यावर स्वयंपाकाचा आनंद घेत. काही मुलं चांगली गात, तर काही खेळात पुढे होती. त्यांच्यात एक भावी डॉक्टरही होता.

अन या साऱ्याचं कारण होतं स्नेहशील आणि कल्पक मुख्याध्यापक कोबायाशी. ते तोत्तोचानला नेहमी म्हणत, ‘ तू खरोखर एक चांगली मुलगी आहेस.’ असंच प्रोत्साहन ते इतरही मुलांना डेट असतील. कोबायाशीचं प्रेम होतं मुलांच्या उत्साही जीवनाचा एक मूलाधार. तोमोईची शाळा म्हणजे घरापासून दूर असं एक घर होतं.

कालची चिमुरड़ी तोत्तोचान आज जपानमधीन लोकप्रिय दूरदर्शन कलाकार तेत्सुको कुरोयानागी या नावानं ओळखली जाते. तिच्या शाळेबद्दल ती खूप काही सांगत राहते. यूनिसेफच्या या सद्भावना दूतापाशी जपानकडून जगाला देण्यासारखं खूप काही आहे. मग ते शिक्षक असोत, पालक असोत किंवा मुलं.

हे लोकप्रिय जपानी पुस्तक विश्वाला संदेश देतंय  –

                                             हजारो फुलं फुलू दे

विचारधारांचा संघर्ष होऊ  दे 

          विश्वाला नवजीवन मिळू दे         

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तोत्तोचान”

Your email address will not be published. Required fields are marked *