Description
राष्ट्रसंतांचे स्मरण :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे खरे खुरे वाहक होते. वारकरी संप्रदायाच्या समतेचा तसेच बुद्धिवादी विचाराचा वारसा कर्मयोगी संत गाडगेबाबांनी पचवून तिला नव्या संदर्भात जिवंत केले. महात्मा गांधी यांच्या निर्घृण खुनाने तळमळणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श कीर्तनातून सांगणारे गाडगेबाबा राष्ट्रसंतांचे समकालीन होते. कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्यात झोकून देणारे गाडगेबाबा राष्ट्रसंतांना गुरुस्थानी होते.
संतकार्याला नवविचाराची झळाही देण्याचे ऐतिहासिक कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या साऱ्या थोर परंपरांचा त्यांनी आदर केला. त्याचप्रमाणे धर्माचे नवे स्वरूप, उपासनेची नवी तऱ्हा व तिला दिलेले वैश्विक स्वरूप ही राष्ट्रसंतांच्या नवनिर्मितिक्षम प्रतिभेची देणगी होय. नव्या संदर्भात धर्माचे स्वरूप पुढे ठेवणारे एक युगद्रष्टे संत म्हणून आधुनिक काळाला त्यांची ओळख आहे.
राष्ट्रसंतांचे नाव प्रगतीपथावर असलेल्या नागपूर विद्यापीठाला देणे त्यांच्या नवे अध्यासन निर्माण करणे तसेच राज्यस्तरीय आदर्श ग्राम योजना राबविणे यातून जागरूक समाजाने त्याच्या कार्याची जण ठेवल्याचे दिसून येते. गावोगावी असलेल्या गुरुदेव सेवा मंडळांनी राष्ट्रसंतांच्या विचाराची ज्योत तेवत ठेवली आहे. त्याचीच हि परिणीती आहे. राष्ट्रसंतांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृती जागविण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
Reviews
There are no reviews yet.