प्रहार

180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव प्रहार
लेखक प्रकाश पोहरे
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २९१ ग्रॅम

Description

जेव्हा आम्ही या देशात जन्म घेतला तेव्हाच आम्ही या देशाच्या नियतीशी बांधल्या गेलो. आपल्या जन्माची आई म्हणजे आपली माता आणि आपल्या कर्माची आई म्हणजे आपली मातृभूमी; माता-पित्याचे आणि मातृभुमीचे ऋण शिरावर घेऊनच आपण जन्माला येता.  हे ऋण यथाशक्ती फेडले पाहिजे, ही सर्वसाधारण अपेक्षा असते.

मातृभूमीची सेवा करायची म्हणजे हातात बंदूक घेऊन सीमेवर लढायला गेलेच पाहिजे असे नाही.  कुठलीही इजा न पोहचविता आणि आपली कुवत, क्षमता, शक्ती, मर्यादा लक्षात घेऊनही आपल्या मातृभूमीची आपल्याला सेवा करता येते.  आपण ज्या क्षेत्रात उद्दिष्टांशी प्रामाणिक राहिलो तरी खूप काही होऊ शकते.  परंतु बरेचदा सोपे कामच खूप अवघड असते.  आपल्या महत्त्वाकांक्षा, आपले विचार आणि विकार बरेचदा आपल्या कर्तृत्वापेक्षा वरचढ ठरतात.

सुदैवाने सगळ्यांच बाबतीत हे होत नाही आणि त्यामुळेच आज अनेक क्षेत्रांचे पावित्र्य टिकून आहे.  वृत्तपत्रक्षेत्र त्याला अपवाद नाही.  स्वार्थी विचार आणि विकारांनी भारलेल्या लोकांनी या क्षेत्राला बदनाम करण्यात कुठलीही कसर ठेवली नाही, परंतु प्रकाश पोहरेंसारख्या स्वार्थापेक्षा समाजहिताला जपणाऱ्या काही धुरंधर पत्रकार – संपादकांमुळेच या  क्षेत्राचे पावित्र्य आजही अबाधित आहे आणि अशी माणसे असतील तोपर्यंत ते राहील यात शंका नाही. या लोकांच्या हातातील लेखणी केवळ पांढऱ्या कागदावर काळी अक्षरे उमटविणारी नसते.  शोषितांच्या बाजूने उठणारा तो आसुड असतो. वृत्तपत्रासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग करून समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्याचा या लोकांचा प्रयत्न समाजाच्या आणि देशाच्या व्यापक हिताला जपणाराच असतो.  प्रकाश पोहरेंचा ‘प्रहार’ हा अशाच प्रयत्नांचा एक भाग आहे.  हे पुस्तक वाचताना एका लढवय्या कार्यकर्त्याच्या प्रामाणिक कळवळ्यातून उमटलेल्या शब्दांची धार किती अकृत्रिम असते याची सतत जाणीव होते.  वास्तविक पाहता त्यांनी जे काही लिहिले ते प्रहार नाही तर टाकीचे घाव आहेत, या टाकीच्या गावातून एक सुंदर समाजशिल्प साकारावे, हाच त्यांचा प्रयत्न आहे आणि तो एक दिवस यशस्वी होईल यात शंका नाही.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रहार”

Your email address will not be published. Required fields are marked *