Description
या सर्व लेखनातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे समाज, पर्यावरण, संस्कृती आणि माणूस यांचा परस्परसंबंध. लेखकाने आपल्या लेखणीतून केवळ समस्या मांडल्या नाहीत, तर उपायांचाही मार्ग दाखवला आहे. हे लेखन म्हणजे एका सजग, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेल्या विचारवंताचे चिंतन आहे. हे चिंतन वाचकाला अंतर्मुख करते, विचारप्रवृत्त करते आणि कृतीकडे नेते. म्हणूनच हे लेखन केवळ वाचण्यासाठीच नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे. हा ग्रंथ म्हणजे समाजाला आरशात पाहण्याची एक संधी आहे, स्वत:ला ओळखण्याची सुधारण्याची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारी एक सजीव साक्ष
या लेखसंग्रहात केवळ विचारांचे आणि भावनांचे दर्शनच नाही, तर चित्रांच्या माध्यमातूनही आशय अधिक प्रभावीपणे उलगडला आहे. प्रत्येक विषयाशी सुसंगत अशा चित्रांची निवड ही केवळ सजावटीसाठी नसून, ती वाचकाकया मनात विषयाची गहनता रुजवण्यासाठी आहे. पर्यावरण, शिक्षण, स्त्रीशक्ती, सेवा आणि समाजदायित्व यांसारख्या विषयांना दृश्य रूप देणारी ही चित्रे लेखनाशी संवाद साधतात. कधी प्रतीकात्मक, कधी वास्तवदर्शी, तर कधी भावनात्मक. त्यामुळे हा ग्रंथ वाचनीय आहे. तर दृष्यानुभवाने समृद्ध असा सजीव दस्तावेज ठरतो.

Reviews
There are no reviews yet.