Description
परंपरेच्या गोंडस नावाखाली आपण कितीतरी खोट्या गोष्टींना प्रतिष्ठा देतो. हे खोटेच इतके मोठे होते कि, मग ते आपणास खरे वाटू लागते. अशा मोठ्या खोट्यामुळेच मात्र खऱ्याची गळचेपी होते. समाजाच्या सर्व वर्गासोबतच मध्यमवर्गाच्याही सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक शोषणाचा आधार ठरलेल्या असत्याचा गौरव सर्वत्र होऊ लागतो. म्हणून सत्याचा शोध घेण्याची आवश्यकता भासू लागते. सत्यशोधनाचा मूळ हेतू शोषणाची पाळेमुळे खणून काढणे हाच असतो. भारतातील चार्वाकांची लोकायत परंपरा, बुद्धांचा प्रतीत्यसमुत्पाद, जोतिबा फुले यांचे मौलिक विचार तसेच डॉ.पंजाबराव देशमुख यांनी केलेली वैदिक साहित्याची चिकित्सा आणि संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनातून होणारे लोकप्रबोधन हे सारे शोषणरहित समाजरचना निर्माण करण्यासाठीच होते.
Reviews
There are no reviews yet.