Description
संत शिरोमणी सावता महाराज हे कर्मवादाने प्रेरित असलेले संत. आपल्या दैनंदिन कामातच परमेश्वर शोधणारे संत. आपल्या मळ्यातील प्रत्येक गोष्टीत त्यांनी परमेश्वर पाहिला. त्यांच्या चरित्रातून कर्मसिद्धांताचे मोल आपल्याला ठायीठायी दिसते. हतभागी होऊन आपल्या नशीबाला दोष देत बसणाऱ्या सर्व सामान्य माणसाला त्यांचे कार्यकर्तृत्व सदैव प्रेरणा देणारे आहे. हे जग आपल्या कष्टावर तरलेले आहे. दुसरा कोणीही आपल्याला तारणारा नाही. तारणार आहेत ते फक्त आपले परिश्रम. हातावर हाट ठेवून काही साध्य होणार नाही. आपल्याला आपल्या स्वत:चा उद्धार स्वत:च करावा लागेल हे ध्यानी धरले पाहिजे. पांडुरंगाला कर्मप्रिय व्यक्तीच आवडते. नशीबावर हवाला ठेवणारी नव्हे असा संत सावता महाराजांचा संदेश म्हणजे हा प्रातिनिधिक कवितासंग्रह आहे.
संत सावता महाराज हे पांडुरंगाचे लाडके भक्त असून त्यांनी दिलेला प्रसाद म्हणजे हा “संत सावता दर्शन” कवितासंग्रह आहे.
Reviews
There are no reviews yet.