कोरड्या घशाचा ताळेबंद

225.00

1 in stock

पुस्तकाचे नाव कोरड्या घशाचा ताळेबंद
लेखक शिवाजी चाळक
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १४४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

पाणी हा मानवी जीवनाचाच नव्हे, तर समस्त सृष्टीचा आधार आहे; म्हणूनच पाण्याला जीवन म्हटलं आहे. महाराष्ट्रासारख्या कमी पावसाच्या प्रदेशातील खडतर जीवनाला धरणांनी अडवलेल्या पाण्याने आधार दिला आहे. सुजलाम सुफलाम धरतीचं स्वप्न धरणांमुळे शक्य होत आहे. कवी शिवाजी चाळक यांना धरणाचं प्रदीर्घ सान्निध्य लाभलं आहे. एकतर कुकडी प्रकल्प परिसरात त्यांचं बालपण गेलंय आणि नंतर स्थापत्य अभियंता म्हणून त्यांची जलसंपदा विभागात चार दशकं कारकीर्द घडलीय. ज्या धरणाच्या कालव्याच्या कामावर त्यांची आई व चुलती राबली, त्याच प्रकल्पावर ते अधिकारी म्हणून निवृत्त झाले. धरण आणि पाण्याशी त्यांचं असं ह्र्द्य नातं आहे.

एका धरणामुळे कालपर्यंत कोरडवाहू असलेल्या परिसराचा हिरवा कायापालट होतो. पाणयामुळे संपन्नता येते, जीवनमान सुधारते. ह्या मोठ्या बदलाचे ते साक्षीदार आहेत. ते मूलत: कवी आहेत.  धरणामुळे मानवी जीवनात झालेलं स्थित्यंतर त्यांनी संवेदनशील मनाने टिपलं आहे.  पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात उतरलेला आनंद त्यांना सुखावतो.  पण संपन्नतेबरोबर जन्माला आलेल्या काही प्रवृत्ती – विकृती त्यांना क्लेश देतात. धरणात हरवलेली गावं, हरवलेली संस्कृती, विस्कटलेली नाती, स्वार्थाने बरबटलेलं राजकारण  त्यांना दुःख  देतं. धरणासाठी ज्यांना जमिनी गमवाव्या लागल्या, स्थलांतर भोगावं लागलं अशा कुटुंबांच्या वेदनांना त्यांनी शब्द दिले आहेत. धरणामुळे आलेल्या आनंदाचा आणि दु:खाचा  हा ताळेबंद आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कोरड्या घशाचा ताळेबंद”

Your email address will not be published. Required fields are marked *