सजीव

338.00

1 in stock

पुस्तकाचे नाव सजीव
लेखक अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५४८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४७९ ग्रॅम

Description

सजीवांच्या उत्पत्तीपासून, उत्क्रांतीपासून ते बायोटेक्नॉलॉजीपर्यंत जीवशास्त्राचा विकास कसा होत गेला याची मनोहारी कहाणी सांगणाऱ्या या पुस्तकात जीवशास्त्राचा इतिहास, त्यातल्या संकल्पना आणि त्यातल्या वैज्ञानिकांची आयुष्यं यांची रंजक गुंफण वाचायला मिळेल. प्रत्येकाला हे पुस्तक खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.

‘जीवशास्त्रावरचं हे पुस्तक अत्यंत सुस्पष्ट, सुबोध आणि सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. सजीवांबद्दलच्या सगळ्या संकल्पना आणि सखोल ज्ञान यात रंजक भाषेत दिलेल आहे. जीवशास्त्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकानंच हे पुस्तक वाचण्यासारखं आणि संग्रहात ठेवण्यासारखं अमूल्य आहे. जीवशास्त्रातल्या ज्ञानाने झगमगून उठणारे हे पुस्तक खूप यशस्वी होवो, या अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांना शुभेच्छा!’

डॉ. राजेश शर्मा, असोसिएट प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट, बायोटेक्नॉलॉजी, VPASC कॉलेज, बारामती.

‘जीवशास्त्राच्या प्रचंड मोठ्या कालपटलाचा. वेध घेणारा नयनरम्य कॅलिडिओस्कोप म्हणजे अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी लिहिलेले ‘सजीव’ हे पुस्तक!!’

प्रा. स्मिता वाडेकर,
माजी विभागप्रमुख, मायक्रोबायॉलॉजी, न्यू आर्ट्स कॉलेज, अहमदनगर.

‘हे पुस्तक म्हणजे शालेय विद्यार्थ्यापासून उच्चशिक्षण घेणाऱ्या सगळ्यांसाठी संदर्भग्रंथ तर असेलच, पण कोणत्याही माणसाला जीवशास्त्राची चहुअंगी ओळख करून देणारा नितांतसुंदर मार्गदर्शक मित्रही असेल यात शंकाच नाही!’

डॉ. बाळासाहेब गायकर, चेअरमन, अॅकॅडमिक काऊन्सिल, पुणे विद्यापीठ. उपप्राचार्य अहमदनगर कॉलेज

‘सजीवांच्या अफाट जगातील अगणित सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी यांच्या शरीररचना, जीवनशैली, पेशी, ऊती, गुणसूत्रे, आनुवंशिकी, जैवरासायनिक प्रक्रिया, त्यांचे पर्यावरणीय मूल्य अशा सगळ्याच बाबींचा घेतलेला आढावा खूप छान आणि वाचनीय आहे. अशा रंजक विश्वाचे दर्शन घडवणाऱ्या या पुस्तकाला तसेच अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे या लेखकद्वयीला खूप खूप शुभेच्छा!”

डॉ. ज्योत्स्ना निजसुरे, प्रोफेसर, रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज, मुंबई.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सजीव”

Your email address will not be published. Required fields are marked *