Description
माणूस जास्तीत जास्ती किती उंच होऊ शकतो ?
आपल्याला किती शब्द अवगत असतात ?
कोणीही किती भाषा शिकू शकतो ?
आपण किती रक्ताचं दान करू शकतो?
संगीतकला किती जुनी आहे?
मानवी देहाची किंमत किती आहे ?
अनेक प्रश्न.
आपल्या ओळखीचे.
आपल्या आसपास घडणारे ?
या नेहमीच्या घटनांमधून उभे राहणारे.
तरीही, आपल्याला काय त्याचं, असं म्हणत नजरेआड केलेले.
पण त्यांचं निराकरण करण्यासाठी जराशी जरी धडपड केली तरी
त्यातून आपल्याला उमगतं ते आपल्या दररोजच्या आयुष्याला व्यापून राहिलेलं विज्ञान.
खरं तर ‘क-का-की’ची बाराखडी म्हणजेच विज्ञानाचा समृद्ध खजिना आपल्याला उघडून देणाऱ्या या गुरुकिल्ल्याच.
त्या अलिबाबाचा खजिना उघडणारा परवलीचा शब्द होता तिळा तिळा दार उघड.
विज्ञानाचा खजिना आपल्याला खुला करून देणारे परवलीचे शब्द आहेत कसं, का, काय, किती, कुठे, केव्हा आणि कोण त्यातलाच हा एक, किती ?
Reviews
There are no reviews yet.