Description
आपल्याला कुजबूज कशी ऐकू येते?
पृथ्वीचं वजन कसं करतात ?
एव्हरेस्टची उंची कशी मोजली ?
आपल्याला वासांची आठवण कशी राहते ?
कबुतरं नेमकी आपल्या घराकडे कशी परततात ?
दुधाचं दही कसं तयार होतं ?
अनेक प्रश्न.
आपल्या ओळखीचे.
आपल्या आसपास घडणारे.
या नेहमीच्या घटनांमधून उभे राहणारे. तरीही, आपल्याला काय त्याचं, अस म्हणत नजरेआड केलेले पण त्यांचं निराकरण करण्यासाठी जराशी जरी धडपड केली, तरी त्यातून आपल्याला उमगतं ते आपल्या दररोजच्या आयुष्याला व्यापून राहिलेलं विज्ञान, खरं तर ‘क-का-की’ची बाराखडी म्हणजेच विज्ञानाचा समृद्ध खजिना आपल्याला उघडून देणाऱ्या या गुरुकिल्ल्याच.
त्या अलिबाबाचा खजिना उघडणारा परवलीचा शब्द होता तिळा तिळा दार उघड, विज्ञानाचा खजिना आपल्याला खुला करून देणारे परवलीचे शब्द आहेत कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा आणि कोणी. त्यातलाच हा एक, कसं ?
Reviews
There are no reviews yet.