Description
आपण का हसतो ?
स्त्रियांना दाढी का नसते ?
वधूवरांवर अक्षता का टाकतात ?
वाहतुकीचे दिवे लाल, पिवळे आणि हिरवेच का असतात?
बोटं मोडताना आवाज का होतो? विजेचा धक्का का बसतो ?
अनेक प्रश्न.
आपल्या ओळखीचे.
आपल्या आसपास घडणारे.
या नेहमीच्या घटनांमधून उभे राहणारे.
तरीही, आपल्याला काय त्याचं, असं म्हणत नजरेआड केलेले.
पण त्यांचं निराकरण करण्यासाठी जराशी जरी धडपड केली तरी त्यातून आपल्याला उमगतं ते आपल्या दररोजच्या आयुष्याला व्यापून राहिलेलं विज्ञान.
खरं तर ‘क-का-की’ची बाराखडी म्हणजेच विज्ञानाचा समृद्ध खजिना
आपल्याला उघडून देणाऱ्या या गुरुकिल्ल्याच.
त्या अलिबाबाचा खजिना उघडणारा परवलीचा शब्द होता तिळा तिळा दार उघड.
विज्ञानाचा खजिना आपल्याला खुला करून देणारे परवलीचे शब्द आहेत
कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा आणि कोणी. त्यातलाच हा एक, का ?
Reviews
There are no reviews yet.