Description
इस्त्रो ही भारतातील अतिशय महत्त्वाची संस्थांपैकी एक गणली जाते. यासाठी इस्त्रोनं देशासाठी दिलेलं केवळ भौतिक योगदान विचारात घेण्याची आवश्यकता नाही. भौतिक योगदानासोबतच देशाचा आत्मविश्वास, अस्मिता आणि प्रेरणा या पातळ्यांवर इस्त्रोचं योगदान अतुलनीय ठरतं. इस्रोच्या कामगिरीतून ‘येस वी क्यान डू इट’ हा आत्मविश्वास भारताच्या जनतेला सातत्यानं मिळत असतो.
आज, एकविसाव्या शतकात भारत तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महाशक्ती बनत आहे. एकेकाळी सायकल आणि बैलगाडीवर रॉकेट नेताना जे जग भारतावर हसलं असेल, तेच जग आज इस्त्रोची प्रगती पाहून चकित होत आहे. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्याच सुमारास इतर अनेक देशांना देखील स्वातंत्र्य मिळालं. मात्र त्यांच्यापैकी कोणताही देश आज तंत्रज्ञानामध्ये भारताएवढा अग्रेसर झाला नाही. तंत्रज्ञानाबाबत आजही ते अमेरिका, रशिया किंवा यूरोपीय देशांवर अवलंबून आहेत. भारत मात्र तंत्रज्ञानाच्या दृष्टीने स्वयंपूर्णतेकडे पावलं टाकत असताना इतर देशांची देखील गरज भागवत आहे. आज विकसित देश देखील आपले उपग्रह पाठवण्यासाठी इस्त्रोची निवड करत आहेत. भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा त्यातील एक मानाचं पान इस्त्रोला नक्कीच असेल.
या संस्थेची जडणघडण कशी झाली ? तिचे शिल्पकार कोण आहेत ? तिच्या आजवरच्या प्रवासात काय अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली ? इस्त्रोसोबतच्या सहयोगी संस्था नक्की काय योगदान देतात ? या क्षेत्रात संशोधनाच्या काय संधी उपलब्ध आहेत ? हे सर्व जाणून घ्या !
रॉकेट सायन्स किंवा इतर कोणतंही शास्त्र हे कधीच क्लिष्ट नसतं. एकदा हे विषय समजावला लागले, की त्यांची गोडी वाटू लागते. ही गोडी अधिकाधिक वाढावी या अपेक्षेसह हे पुस्तक आपल्या होती देत आहोत
Reviews
There are no reviews yet.