Description
कॉलरा (पटकी), अथ्रेक्स, टीबी (क्षय), सिफिलीस (गुप्तरोग) घटसर्प यावर अफाट संशोधन केलेल्या रॉबर्ट कॉख या जर्मन वैज्ञानिकाला त्याच्या वैद्यकीय शाखेतल्या अमूल्य योगदानाबद्दल 1905 साली नोबेल पुरस्कार जाहिर झाला. त्यानं वेगवेगळ्या विकारांवर संशोधन कसं करायचं यात बदल घडवून नवीन पद्धती सुचवल्या.
कॉखला त्याच्या मृत्यूनंतरही अनेक देशांत गौरविण्यात आलं. जागतिक दर्जाची कीर्ती लाभुनही कॉखच्या पोशाखात फरक पडला नाही, ना चालण्याबोलण्यात, ना वागण्यात. त्यासा स्वभाव अखेरपर्यंत तसाच होता. मानवजातीच्या कल्याणासाठी अखंडपणे काम करणारा आणि आपल्या संशोधनानं लाखो, करोड़ोंना मृत्यूच्या दाढ़ेतून ओढून आणणारा डॉ. रॉबर्ट कॉख जितका उंचीवर पोहोचला, तितका तो वृक्षाच्या एका डहाळीसारखा विनम्र झुकलेलाच राहिला.
कॉख म्हणायचा, ”मी खूप मोठं कार्य केलं असं सगळ्यांना वाटतं, पण मी केवळ निमित्तमात्र आहे. कारण मी चालताना मला माझ्या वाटेवर सोनं सापडलं यात माझं मोठेपण ते कसलं ?”
Reviews
There are no reviews yet.