गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग

225.00

1 in stock

पुस्तकाचे नाव गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग
लेखक बेन कार्ल्सन, रॉबिन पॉवेल
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २००
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १९८ ग्रॅम

Description

आर्थिक स्वातंत्र्य याचा अर्थ तुमच्यासाठी पुढीलपैकी काहीही असू शकतो : आपल्याला हवं तसं आयुष्य जगणं, दुसऱ्या कोणीतरी आखलेल्या वेळापत्रकानुसार काम करावं न लागणं, पुन्हा कधीही पैशांची चिंता करावी न लागणं किंवा इतर एखादं स्वप्न पूर्ण करणं. मात्र, गुंतवणूक करणं हाच यांपैकी कुठलाही अर्थ प्रत्यक्षात उतरवण्याचामार्ग असतो.
या मुद्देसूद आणि सहज उपलब्ध असलेल्या पुस्तकातून बेन कार्ल्सन आणि रॉबिन पॉवेल तुम्हाला सुज्ञपणे केलेल्या बचतीच्या आणि थेट गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर कशी पावले टाकावीत, ते दाखवतात.
हे पुस्तक झटपट श्रीमंत कसे व्हावे याविषयीचे नाही. मात्र, ते नक्कीच विश्वासार्हपणे श्रीमंत होण्याविषयीचे आहे. आर्थिक स्वातंत्र्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट बाळगून गुंतवणुकीच्या माध्यमातून संपत्तीची उभारणी करण्यासाठी शिस्त, त्याग आणि वेळ यांची गरज असते; परंतु ते शक्य असतं आणि जवळजवळ प्रत्येक जणच ते करूही शकतो. पण त्यासाठी योग्य माहिती मिळणं अतिशय गरजेचं असतं.

तुमचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उचलाव्याच लागणाऱ्या सगळ्या पावलांविषयी हे पुस्तक तुम्हाला सांगतं. त्यांच्यामध्ये पुढील प्रश्नांच्या स्पष्ट आणि साध्या उत्तरांचा समावेश आहे.

  • बचत करणं का महत्त्वाचं असतं आणि किती बचत केली पाहिजे ?
  • गुंतवणूक हा संपत्ती उभारणीचा सगळ्यात उत्तम मार्ग का आहे ?
  • गुंतवणूकदारांनी स्टॉक मार्केटकडून कुठली अपेक्षा ठेवली पाहिजे ?
  • लक्षाधीश होण्यासाठी खरोखरच किती कालावधी लागतो ?
  • तुम्ही बचतीला आणि गुंतवणुकीला लवकर सुरुवात करू शकला नसाल तर नंतर त्यासाठी खूपच उशीर झालेला असतो का ?

हे पुस्तक वाचल्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग”

Your email address will not be published. Required fields are marked *