Description
कुरुंदवाड सीनियर संस्थानचा इतिहास (१७३६ – १९४८)
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मुंबई प्रांतात अनेक लहान-मोठी मिळून अठरा संस्थाने होती. या मुंबई इलाख्यातील संस्थानाना भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर (१७४९) मराठेशाहीमध्ये छत्रपतींची केंद्रसत्ता दुर्बल होत जाऊन पेशव्यांचे वर्चस्व वाढले आणि पेशवाईत जी सरदार घराणी उदयास आली व दक्षिणेत ज्यांच्या पराक्रमाच्या आधारावर पेशवाई डौलाने डोलत राहिली त्यात पटवर्धन घराणे नावाजण्याजोगे होते. दक्षिणेकडे श्रीरंगपट्टणपर्यंत मराठी आमलाची लाट जाऊन धडकली ती पटवर्धन सरदार घराण्यामुळेच होय. या पटवर्धन घराण्यामध्ये कुरुंदवाड पटवर्धन सरदार घराण्याची कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पटवर्धनाची सरदारकी ही सुखाची भाकर नसून ती तापल्या तव्यावरची भाकर होती. अनेक वीरांचे बळी देऊन पटवर्धन, सरदारांनी पेशवाईत मराठा साम्राज्याची दक्षिण बाजू खंबीरपणे तुंगभद्रेपर्यंत मजबूत करून ठेवली होती. या पटवर्धन सरदार घराण्यामध्ये कुरंदवाड पटवर्धन घराण्याची कामगिरी उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. कुरुंदवाड पटवर्धन सरदार अत्यंत विश्वासू, एकनिष्ठ, पराक्रमी सरदार म्हणून उदयास आले. दक्षिणेकडील राजकारण कुरुंदवाड पटवर्धन सरदार घराण्याभोवती केंद्रित झालेले दिसून येते. यावरून स्पष्ट होते की कुरुंदवाड पटवर्धन घराण्याचा उदय आणि उत्कर्ष हां पेशवे काळात झालेला आहे.
Reviews
There are no reviews yet.