Description
बोधात्मक, वर्तनात्मक व क्रियात्मक हे माणसाचे तीन पैलू आहेत जे एकमेकांपासून भिन्न करणे अशक्य आहे. या तिन्ही पैलूंचा एकमेकांवर प्रचंड प्रभाव असतो. एखाद्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून समजून घेण्यासाठी या तिन्ही घटकांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही दोन व्यक्ती एकसारखा विचार करीत नाहीत. त्यामुळे एखादी चाचणी किंवा साधन तयार केले तरी ते प्रत्येक व्यक्तीवर कसे वापरता येणार? किंवा काही जणांच्या अनुभवावरून मिळालेले निष्कर्ष सगळ्यांना कसे लागू करता येणार? अशी आव्हाने असली तरीही मानवी वर्तनाचा आणि मनाचा थांग थांगपत्ता घेण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी अनेक मानसशास्त्रीय चाचण्या विकसित केल्या आहेत, ज्या मनोमापनासाठी उपयुक्त आहेत.



Reviews
There are no reviews yet.