Description
पानगळही, पालवीही !
शरीर क्लान्त झाले
बुद्धी श्रान्त झाली
श्वासोच्छ्वासाची खात्री नाही
इतकी मनाची पानगळ झाली
वाटले
सर्व काही संपले
तेव्हा
प्रलयाचे थैमान चालू असतानाच
कोण जाणे कशी
माझ्या अंतरीच्या गाभ्यातून
दोन चिमुकली कोवळी पाने
मोठ्या ऐटीत डोकावली !

Reviews
There are no reviews yet.