श्रीविठ्ठल एक महासमन्वय

810.00

1 in stock

पुस्तकाचे नाव श्रीविठ्ठल एक महासमन्वय
लेखक रा. चिं. ढेरे
ISBN 978-93-82161-19-6
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ४२३
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६४० ग्रॅम

Description

श्रीविठ्ठल हा गेली आठ शतके मराठी लोकमानसात प्रेमाचे अधिराज्य गाजवतो आहे. भक्तीचे भाग्य अनुभवतो आहे. संतांनी त्याला कानडा म्हटले आहे. ‘चोविसांवेगळा’ अन  ‘सहस्त्रांआगळा’ म्हणून गोरविले आहे. ‘दिगंबर बालगोपाल ‘ म्हणून त्याचे रूप वर्णिले आहे.

संतांच्या दृष्टीने तो ‘गोपवेष हरी’ असूनही ‘विष्णुसहित शिव’ आहे. त्याने बुद्धाशी बुद्ध्याच नाते जोडले आहे अन जिनाशीही जवळीक साधली आहे.

हा मूळचा यादव जनजातींचा म्हणजे गवळी – धनगरांचा लोकदेव. त्या जनजातींतुन उदय पावलेल्या यादव राजकुळांनी त्याचे वैभव वाढवले, अन त्याला विष्णु – कृष्ण – रूप प्राप्त करून दिले.

पंढरपूरचा मूळचा अधिष्ठाता देवा असलेल्या पुंडरीकेश्वराला वैष्णव भक्तोत्तमांच्या रुपात अन शूद्रातिशूद्रांची देवी असलेल्या चिंचबनातल्या म्हणजे दिंडीरवनातल्या  लखूबाईला आपल्या सहचरीच्या रूपात स्वीकारणारा हा लोकप्रिय देव महाराष्ट्रात महासमन्वयाचा स्रष्टा बनला आहे.

या शोध-ग्रंथात प्रख्यात संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या शोधप्रज्ञेच्या  स्पर्शाने श्रीविठ्ठलाच्या आदिरूपाचे अन त्याच्या महासमन्वयशील उन्नयनप्रक्रियेचे रहस्य  सहस्रदलकमलाप्रमाणे उमलून आले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “श्रीविठ्ठल एक महासमन्वय”

Your email address will not be published. Required fields are marked *