जगभरातले धटिंगण

180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव जगभरातले धटिंगण
लेखक निळू दामले
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १२४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २३० ग्रॅम

Description

आज अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. तिथे निवडणूक होते.  तिथे माध्यमं आहेत.  न्यायालयं, विरोधी पक्ष सारं काही आहे. हे सारे लोकशाहीचे कठडे. सत्तेचा गाडा लोकशाहीच्या मार्गावरून घसरू नये यासाठी त्यांची योजना असते.  पण लोकशाही व्यवस्थेत राहूनच या कठड्यांना धडका देणारे सत्ताधीश सतत तयार होत असतात.  असे अनेक सत्ताधीश आजही जगात उन्माद माजवत आहेत.  त्यातले काही आता थेट हूकूमशहा म्हणून ओळखले जातात, तर काहींचे चेहरे अद्याप बुरख्याआड आहेत.

असे हूकूमशहा का तयार होतात ? त्यांच्या उदयाला त्या देशाचा इतिहास किती आणि कसा कारणीभूत असतो ? आपली निरंकुश सत्ता ते कशाच्या जोरावर टिकवून ठेवतात ?

जगातल्या निवडक दहा धटींगणांचा हा प्रवास सांगणारं, लोकशाही देशांतल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारं पुस्तक.      

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जगभरातले धटिंगण”

Your email address will not be published. Required fields are marked *