Description
१९७२ चा तो काळ अजूनही माझ्या स्मरणात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेने रोजगार हामी कायदा मंजूर केलेला होता. प्रचंड मोठा दुष्काळ या वर्षी पडला होता. त्या काळात झांबरशेठ जुन्नरचे विधानसभेतील सदस्य होते. झांबरशेठ यांच्या आमदारकीच्या काळातील हाच खरा कसोटीचा काळ होता. पिण्याला पानी नाही, लोकांना रोजगार नाही, जनावरांना चारा नाही अशा एका भयान परिस्थितीत महाराष्ट्र सापडला होता. झांबरशेठ यांनी त्या काळात अनेक रोजगार हमीची कामे काढून मागेल त्याला काम ही योजना राबवली, अनेक कामांची सर्वेक्षणे झाली. रोजगार हमी योजनेचा पुरेपूर लाभ त्या अडचणीच्या काळात झाला. अनेक रस्ते, छोटे बंधारे, पाझर तलाव यांची निर्मिती झाली. हे सर्व करण्यासाठी प्रपंचावर तुळशीपत्र ठेवूनच आमदारांचे तालुकाभर दौरे सुरू असत. याच काळात देशाचे नेते मा. शरदराव पवार हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांची पूर्णपणे साथ मा. तांबे साहेबांना मिळाली. राजकीय चरित्र
Reviews
There are no reviews yet.