मध्यमकल्लोळ

540.00

Out of stock

पुस्तकाचे नाव मध्यमकल्लोळ
लेखक नीलांबरी जोशी
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६८२ ग्रॅम

Description

जोहान्स गुटेनबर्ग ते मार्शल मॅक्लुहान यांच्यात पाचशे वर्षांचा काळ गेला आहे. में माध्यम उपयुक्त म्हणून अवतरले ते आता माध्यम महार म्हणून झाले आहे. या महासुराचा हात भस्मासुराप्रमाणे मानवी संस्कृतीच्या डोक्यावर येत आहे. हा राक्षसी जगपाल कल्लोळ कदाचित भविष्यातील माणसाचे जीवन मलाही करू शकेल वा विनाशही ओढवू शकेल. पण ते भवितव्य आपल्या हातांत आहे. मात्र ते भविष्ण घडवण्यासाठी प्रथम तो माध्यमकल्लोळ समजून घ्यायला हवा. नीलांबरी जोशी यांनी त्या महाराक्षसाच्या गुहेत प्रवेश करून त्याची कुंडली मांडली आहे.
कुमार केतकर
ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक आणि खासदार

माध्यमांनी आपले जगणे व्यापून टाकले आहे. आपल्या आवडीनिवडी, अगदी आपल्या भावविश्वावरही त्यांनी आपल्या नकळत ताबा मिळविला आहे. गेल्या तीस वर्षात माध्यमजगतामध्ये झालेले हे परिवर्तन स्तिमित करणारे तर आहेच, पण बहुसंख्य वेळा घाबरवणारेही आहे. ध्रुवीकरण हा घातल्या काही माध्यमकर्मीसाठी परवलीचा शब्द झाला आहे. त्रिवार सत्य आणि निखालस खोटे यामधील प्रचंड दरी अदृश्य करण्याचे या मंडळींचे कसब हे समाजाच्या मुळावर येणारे आहे. माध्यमांनी निर्माण केलेल्या या कल्लोळाविषयी नीलांबरी जोशी यांनी केलेले चिंतन विचार करायला लावणारे आहे.
राजीव खांडेकर
एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, एबीपी न्यूज नेटवर्क मुख्य संपादक, एबीपी न्यूज, एबीपी माझा

आज परिस्थिती अशी आहे, की काल फक्त वाचक, श्रोते वा प्रेक्षक असलेले आपण सारे आज या माध्यमजगताचा एक भाग बनलो आहोत. हे नेमके होते कसे? सामान्य माणसांचेही चंगळवादी ग्राहक वा हिंस ट्रोल्स कसे तयार केले जातात? नीलांबरी जोशी यांच्या या पुस्तकातून अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत जातात. माध्यमी मानसशाखाच्या खोल अभ्यासातून अवतरलेले असे हे पुस्तक – माध्यमकल्लोळ. ते वाचणे ही एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपली गरज आहे.
रवि आमले
पत्रकार, लेखक व माध्यम अभ्यासक 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मध्यमकल्लोळ”

Your email address will not be published. Required fields are marked *