समजून घेऊ या मनाला

225.00

Out of stock

पुस्तकाचे नाव समजून घेऊ या मनाला
लेखक श्रीरंग बखले
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १९४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १७० ग्रॅम

Description

सारं आयुष्य दु:खद घटनांनी भरलेलं असतानाही काही लोक आनंदी दिसतात, तर काहींच्या आयुष्यात सुखाची रेलचेल असूनही ते दुःखी-कष्टी दिसतात. याचं रहस्य त्या त्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये दडलेलं असतं. म्हणजेच तुम्हाला होणारा आनंद आणि तुम्हाला होणारं दुःख हे तुमच्या आयुष्यात जे घडतं त्यावर अवलंबून नसतं, तर ते तुम्ही त्या घटनांकडे कास बघता यावर अवलंबून असतं. त्यामुळेच ‘माणसाचं मन’  याला विशेष महत्त्व प्राप्त होतं. किंबहुना आपल्या व्यक्तिमत्वाची सर्वात महत्त्वाची बाजू ही आपलं मन असते. म्हणजे व्यक्ती म्हणून आपण जे कोणी असतो त्यामागे प्रामुख्याने आपलं मन असतं. आपलं मन जैसा विचार करत किंवा जे सांगतं तसेच आपण घडत असतो.

असं असलं तरी आपण एकूण शारीरिक आरोग्याबाबत जेवढे जागरूक असतो तेवढे मनाच्या आरोग्याबाबत नसतो. किंबहुना मनाचंही आरोग्य जपायचं असतं  हेच आपल्या गावी नसतं. कारण मन म्हणजे काय? ते काम कसं करतं? त्याची अवस्था कशी आहे? कशी असावी? याबद्दल आपण पूर्णपणे आद्न्यानी असतो. त्यामुळे आपलं मन आजारी आहे की निरोगी हेच आपल्याला उमगत नाही. डॉ. श्रीरंग बखले यांनी नेमका हाच धागा पकडून हे पुस्तक लिहिलं आहे.

अर्थात हे पुस्तक केवळ मनाच्या कार्यप्रणाली बद्दलच माहिती देते  असं नाही, तर एकटेपणा, दुःख, भीती, संताप, व्यसन या बरोबरीनेच आनंद, उत्साह , कुतूहल, सर्जनशीलता अशा अनेक पैलूंकडे बघण्याची एक नवी दृष्टी देतं. तेव्हा मनाचं आरोग्य जपायला मदतगार ठरू शकणारा हां मार्गदर्शक आपल्या होती असायलाच हवा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समजून घेऊ या मनाला”

Your email address will not be published. Required fields are marked *