मनात

450.00

Out of stock

पुस्तकाचे नाव मनात
लेखक अच्युत गोडबोले
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६०२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५५३ ग्रॅम

Description

पाश्चात्त्य ज्ञानशाखांची ओळख मराठीत करून देण्याच्या अच्युतच्या प्रचंड प्रकल्पातील हे नवे पुस्तक ‘मनात’ चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या ‘मेंदू आणि मानस’ या विश्वाची विमानयात्रा घडेल. याहून स्वस्त एअरलाइन उपलब्ध नाही.

– डॉ. अभय बंग

असंख्य वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडेल अशी मानसशास्त्राची रंजक कहाणी सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वांना प्रचंड उपयुक्त ठरेल.

– डॉ. प्रकाश आमटे

‘मनात’ व्यापक अर्थानं माहिती देणारं अच्युत हे पुस्तक म्हणजे असणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी भरभरून असा खजिनाच आहे.

डॉ. रवी बापट

व्यापक अभ्यासपूर्ण विषयाची संपूर्ण ओळख करून देणारं, अतिशय पायाभूत माहिती असलेलं मानसशास्त्रावरचं अच्युतचं हे नवं पुस्तक ‘मनात’ फॉसनेटिंग आहे.

डॉ. मोहन आगाशे

‘मनात’ मराठीत तर सोडाच; पण भारतात लिहिल्या गेलेल्या मानसशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही, इतका विस्तृत तपशील लालित्यपूर्ण शैलीतून मांडला आहे.

– प्रा. एम. एन. पलसाने 

श्री. अच्युत गोडबोले यांचा ‘मनात’ हा ग्रंथराज म्हणजे, चौकस वाचकांना मानसशास्त्राच्या प्रमुख अंगांचा परिचय करून देणारे ‘बौद्धिक’ खाद्य ठरू शकेल.

– प्रा. डॉ. भरत देसाई

देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं, त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुद्धा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दांत वाचकांसमोर मांडला आहे. यामागे त्यांचं प्रदीर्घ वाचन आणि तपश्चर्या निश्चितच दसून येते.

– डॉ. सुधाकर देशपांडे

इंग्रजीमध्ये विल ड्युरान्तच्या ‘स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ या पुस्तकाचे जे अढळ स्थान आहे, ते ‘मनात’ या पुस्तकाला मराठीत मिळणार आहे, हे निश्चित !

– डॉ. आनंद नाडकर्णी

‘मनात’ या पुस्तकातला प्रत्येक शब्द विषयाचं मर्म उलगडवून सांगत वाचकांशी सहज दोस्ती करणारा आहे. केवळ अच्युतच ते लिहू जाणे…!

– डॉ. राजेंद्र बर्वे

मानसशास्त्रावरचं ‘मनात’ हे अच्युतनं लिहिलेलं पुस्तक वाचलं आणि त्यांच्या उत्तुंग आणि अचाट प्रतिभेची प्रचिती आली. हे पुस्तक नक्कीच एक इतिहास घडवणार, यात शंकाच नाही!

– डॉ. प्रदीप पाटकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनात”

Your email address will not be published. Required fields are marked *