Description
मानसशास्त्र हे एक आधुनिक शास्त्र म्हणून एकोनिसाव्या शतकात उदयास आले असले तरी, विसाव्या शतकातच विशेषत: विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या शास्त्राचा विकास फॉर जलद गतीने होत गेला. सध्या मानसशास्त्र म्हणजे विविध भौतिकशास्त्रे आणि मानविकी व सामाजिकशास्त्रे यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे. एवढेच नव्हे तर यापुढे येणाऱ्या शतकामध्ये मानवी मन, त्याची कार्यपद्धती व मानवी व्यवहार यांवर प्रकाश टाकू शकेल असे हे महत्त्वाचे आधुनिक शास्त्र आहे. मानसशास्त्राच्या कित्येक महत्त्वाच्या शाखा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाढीला लागल्या असल्यामुळे आणि भारतीय भाषांतून जे मानसशास्त्रीय परिभाषा कोश आतापर्यंत प्रसिद्द करण्यात आले ते मुख्यता: या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्ध करण्यात आले असल्याने त्याद्वारे उपलब्ध झालेल्या शब्द संपत्तीची व्याप्ती अत्यंत मर्यादित व अपूरी आहे. त्यामुळे त्याला जोड़ म्हणून नवीन परिभाषा पर्यायाची आवश्यकता आहे. मानसशास्त्र या विषयाच्या भारतातील विकासाची पार्श्वभूमी वरीलप्रमाणे आहे. मुख्यत्वेकरून 1950 च्या सुमारास किंवा त्यानंतरच्या गेल्या 30-40 वर्षांच्या काळात हा विषय भारतीय विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात मान्यता पावला आहे. अलीकडच्या काळात या विषयासंदर्भात झालेली वाढ आणि मानसशास्त्र विषयाच्या पारिभाषिक संज्ञा बनवण्याचे पूर्वी केलेले प्रयत्न यांची तुलना करता पूर्वीचे प्रयत्न तोकडे आणि अपुरे वाटतात.
Reviews
There are no reviews yet.