Description
शरीराला आणि मनाला सवयी का व कशा लागतात ?
त्यामागील शरीरक्रिया आणि मनोव्यापार कोणते ?
नियमित आहार आणि निद्रा व्यायाम आणि सकाळचा प्रसन्न उत्साह या सवयींतून प्रकृती…
गैरशिस्त, अव्यवस्थितपणा, व्यसनं आणि भयभीतता या सवयींमधून विकृती…
आणि
वक्तशीरपणा, वागण्या-बोलण्यातील आदब आणि सभ्यपणा या सवयींमधून संस्कृती व्यक्त होते.
आपल्याला वाटचाल करायची आहे विकृतीकडून… संस्कृतीकडे !
वाईट सवयींमधून सुटका हा फ़क्त एका क्षणाचा प्रश्न असतो.
नकळत घडणाऱ्या चुकीच्या कृतीला टाळायचं असल्यास एखाद्या क्षणही पुरेसा असतो.
पुरेसा असतो तो क्षण असतो मोहातून तल्लख आत्मभान बाळगण्याचा.
तो क्षण असतो मोहातून स्वत:ला सोडविण्याचा.
तो क्षण असतो एखादा दीर्घ श्र्वासाकरता !
त्या दीर्घ श्वासानं मनात सुविचाराला जागा मिळते.
त्या दीर्घ श्वासानं क्षणकाल डोळे मिटून आपण मनात तटस्थ भाव जागृत करतो.
त्या दीर्घ श्वासानं मनातील मोह, भीती, काळजी आणि धास्ती मिटते.
त्या दीर्घ श्वासानं मनाला हुरूप येतो. मनातील आत्मविश्वास खडबडून जाएगा होतो.
Reviews
There are no reviews yet.