Description
मानसिक आजार आणि त्यांच्याबद्दलच्या पूर्वीपासूनच्या कल्पना, मनोरुग्णालयांचा इतिहास तसंच मानसोपचारांची आधुनिक उपचारांपर्यंत झालेल्या प्रवासाचा लेखाजोखा असणारं, मानसोपचारांची ओळख करुन देणारं, CBT आणि REBT या मानसोपचारांवर भर देणारं तसंच मानसोपचारांचा भविष्यवेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘सायकोथेरॅपीज’!
‘अच्युत गोडबोले आणि आसावरी निफाडकर यांनी लिहिलेलं ‘सायकोथेरॅपीज” हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. त्यातले संदर्भही योग्य पद्धतीनं मांडले गेले आहेत. या पुस्तकामुळे मानसोपचारांबद्दलचे अनेक प्रचलित गैरसमज दूर होतील, अशी आशा आहे.’
डॉ. आनंद नाडकर्णी,
प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ, उत्कृष्ट वक्ता, प्रशिक्षक, नाटककार आणि लेखक IPH संस्थेचे संस्थापक
‘कोणालाही उत्तम कळेल व आपल्या भावनिक व मानसिक त्रासातून बाहेर येण्याची दिशा दाखविण्याचे काम हे पुस्तक निश्चित करेल यात शंका नाही. नक्की वाचावे व कृतीत आणावे असे
पुस्तक!”
डॉ. मानसी देशमुख,
प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ (REBT थेरपिस्ट)
‘शरीराला ताप येतो तसाच मनालाही ताप येतो! मनाच्या तापाची लक्षणं आणि त्यावरचे उपाय प्रत्येकाने समजून घ्यावे यासाठी हे पुस्तक!”
डॉ. सुखदा अभिराम,
प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ (REBT थेरेपिस्ट), IPH संस्थेच्या केंद्रप्रमुख
‘या पुस्तकात वाचक तसेच मानसिक आरोग्यशास्त्राचे अभ्यासक यांच्यासाठी मनोरंजक अंर्तदृष्टी आणि किस्से आहेत, एक अभ्यासक आणि शिक्षणतज्ञ म्हणून मी या पुस्तकाची शिफारस सर्वांना करेन.’
डॉ. साधना नातू,
असोसिएट प्रोफेसर आणि प्रमुख, यूजी आणि पीजी मानसशास्त्र विभाग, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड, स्त्रीवादी मानसोपचारतज्ञ, संशोधक.
Reviews
There are no reviews yet.