Description
‘इशारा’ आणि ‘ इषारा’ यांच्या अर्थांत नेमका फरक काय? कांद्याला ‘ कृष्णावळ’ असं म्हणतात ? ‘ सुरळीत पार पडणे’ किंवा ‘ झक मारणे’ म्हणजे नेमकं काय आणि या म्हणी तयार तरी कशा झाल्या ? इथपासून ते पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे आणि हडप, काशिद, शिकलगार, पोतनीस, इथपर्यंतची आडनाव का आणि कशी पडली ? याला काही ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ आहेत का ? असल्यास ते कोणते ? याच कुतूहल शमवणारी ही ‘ शब्दांची कहाणी’.
फ़ारसी, पोर्तुगीज आणि इतर भाषांतून जसे शब्द आले तसे मराठीतूनही इतर भाषांत काही शब्द गेले ; ते कोणते ? कृष्णाकाठच्या वांग्याच ‘भरीत’ तर सर्वांच्या आवडीच. पण या भरीत शब्द म्हणजे अरबस्तानातल्या ‘ बुर्रानीयत’ चं मराठी रुपड; तर ‘तर ‘डॅम्बीस’ म्हणजे ‘यू डॅम्ड बीस्ट’ किंवा ‘डांबरट’ म्हणजे ‘यू डॅम्ड रेंट’चं मराठीकरण हे सांगणारी ही ‘शब्दांची कहाणी’.
‘भाऊगर्दी’ आणि ‘सतराशे साठ’ ही पानिपताची देणगी; तर ‘इश्श’ आणि ‘अय्या’ ही तामिळीची देणगी. ‘दिलखुलास’ आणि ‘आतषबाजी’ फारसीमधली; तर ‘इसान’ आणि ‘पखाल’ चक्क संस्कृतमधली. त्यांचा आजच्या मराठीपर्यंतचा प्रवास सांगणारी ही ‘शब्दांची कहाणी’.
मराठीच्या पन्नासावर बोलीभाषा आणि त्यांतील गमतीदार म्हणी, वाक्प्रचार, यांबरोबरच त्या बोली बोलणाऱ्या आदिवासींच्या चालीरीती आणि शब्दांचा योग्य वापर न केल्यानं आपण घालत असलेला गोंधळ सांगणारी ही ‘शब्दांची कहाणी’,
Reviews
There are no reviews yet.