Description
भटकंतीच्या प्रकाशवाटेने अज्ञानाचा भूप्रदेश उजळून टाकणारे पुस्तक म्हणजे “भटकंतीशास्त्र”. झापडबंददृष्टी आणि कूपमंडूकवृत्ती यांना नाकारत प्रबुद्ध होण्यासाठी देशाटन केले पाहिजे असा संदेश पुस्तकाच्या पानापानावर आहे. भटकणे हा पुस्तकाचा मुख्य विषय असला तरी सदरील पुस्तक हे प्रवासवर्णनाचे पुस्तक नाही. पुस्तकात सगळीकडे भटकंतीच्या तत्वज्ञानाची चर्चा आहे. भटकंती ही माणसाला ज्ञानी, डोळस आणि व्यापक बनविते. अनेक गोष्टी शिकविते तसेच, मोहपाशाची बंधने तोडायला आणि देशी-विदेशी प्रेमैत्र जोडायलाही शिकविते. तारुण्यात सगळ्यांनी भटकंती करायला हवी कारण त्यामुळे माणसाच्या आयुष्याला दिशा आणि मार्ग सापडतात. त्याअर्थाने, “भटकंतीशास्त्र” हे माणसाला काहीसे बिघडविणारे आणि बरेचसे घडविणारे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.