Description
” आजच्या जगात राहायचं तर जागतिक परिमाणांची ओळख करून घेणं अगत्याचं आहे. अनेक जागतिक परिमानांपैकी जागतिक वाङ्मय हे महत्त्वाचं मानता येईल, कारण प्रत्यक्ष जीवनाचं प्रतिबिंब त्यात उमटलेलं असतं. मुळात पाश्चिमात्य वाङ्मय समृद्ध आणि सकस. त्या वाङ्मयाच्या मूळ स्रोताला अनेक जागतिक भाषांचे प्रवाह येऊन मिळालेले. आशा वेळी पाश्चिमात्य वाङ्मयाच्या परिशीलनानं मनोविकास आणि जागतिक भान या दोहोंचा बेगमी होणार. सिद्ध हस्त लेखक अच्युत गोडबोले यांनी रसपूर्ण पद्धतीनं लिहिलेला हा पाश्चिमात्य वाङ्मयाचा इतिहास मराठी भाषकांना पर्वणीच वाटेल. या पुस्तकाची आवश्यकता होतीच. ते लिहावं असं आतापर्यंत कुणाला का वाटलं नाही, याचचं आश्चर्य वाटतं.”
अरुण टिकेकर ,
प्रसिद्ध लेखक, टीकाकार आणि ‘ लोकसत्ता’ चे माजी संपादक
” पाश्चिमात्य साहित्यातल्या अनेक अतिशय गाजलेल्या साहित्यकार आणि साहित्यकृती त्यांच्याविषयी मराठी वाचकांना अत्यंत रंजक आणि वाचनीय शैलीमध्ये सखोल आणि परिपूर्ण त्यांच्यासाठी ‘ झपुरर्झाने पाश्चिमात्य साहित्याचं दालनचं खुलं केलं आहे !’
प्रा. ललिता परांजपे,
माजी इंग्रजी विभागप्रमुख, रुईया कॉलेज , मुंबई
Reviews
There are no reviews yet.