Description
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हे इतिहास अभ्यासकांचे आणि पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. तसेच, चावंड, जीवधन, हडसर, कुंजीरगड, निमगिरी, शिंदोळा आणि नारायणगड हे देखील जुन्नर तालुक्यातील दुर्ग वैभवाचे अनमोल ठेवे आहेत. या गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही ‘जुन्नरचे दुर्गवैभव’ हे संदर्भ पुस्तक लिहिले आहे. जुन्नर तालुका फक्त गडकिल्ल्यांपुरता मर्यादित नाही, तर तो प्राचीन अवशेष, लेणी पर्यटन, धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, वैज्ञानिक पर्यटन आणि यांसारख्या विविध पर्यटन संकल्पनांमुळे ओळखला जातो. पर्यटक आणि अभ्यासकांना या पर्यटन विविधतेची ओळख व्हावी, यासाठी जुन्नरचे दुर्गवैभव हा ग्रंथ वाचक, पर्यटक, दुर्गसंवर्धक, इतिहास अभ्यासक आणि संशोधकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
Reviews
There are no reviews yet.