Description
देवराया फ़क्त निसर्ग, वनस्पती, प्राणी यांच्या संरक्षणाचे साधनच नाहीत तर मानवी उत्क्रांती, आध्यात्मिक व भौतिक बदलांचे एक स्पष्ट चित्रच आहेत. हा बदल आपणांस देवरायांच्या माध्यमातून सहजपणे बघावयास मिळतो. म्हणूनच देवरायांचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. मानव वंश शास्त्राच्या अभ्यासातून असे दिसून येते की, मानवी उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे आचरण, संकल्पना व समाजव्यवस्था अस्तित्त्वात होत्या. ह्या सर्व कालखंडात मानव निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून राहिला आहे, व तसा तो प्रदर्शित पण झालेला आहे. तो अविभाज्यतेकडून विभाज्यतेकडे कसा जाट आहे याचे प्रतिबिंब आपणास देवरायांमधून दिसते. किंबहुना असे म्हणू की एका अविभाज्य निसर्ग घटकाकडून नागरतेकडे वळलेले मानवाचे स्वरूप देवरायांच्या अभ्यासाअंती आपणांस समजते.
Reviews
There are no reviews yet.