Description
अडीच हजार वर्षापूर्वी ब्राह्मणी व्यवस्थेला, वैचारिक बंडखोरी करून तथागत बुद्धांनी मूठमाती दिली. महाप्रज्ञावंत तथागताने आपल्या प्रबुद्ध वाणीतून अत्यंत मैत्री भावनेने ब्राम्हणी व्यवस्थेला परिवर्तित करण्याचे क्रांतिकारी कार्य केल्यानेच ते जगातील पहिले बंडखोर ठरले, पहिले थोर समाजसुधारक ठरले. तथागतांनंतर ब्राह्मणी व्यवस्थेची चिकित्सा व चीरफाड क्रांतीबा जोतीराव फुले यांनी आपल्या “गुलामगिरी” या प्रबुद्ध ग्रंथातून व मराठीतील पहिल्या ‘तृतीयरत्न’ या सामाजिक नाटकातून केली. स्वत:ला भूदेव म्हणवून घेणाऱ्या ब्राह्मणशाही विरुद्ध व त्यांच्या शोषण नीतिविरुद्ध क्रांतिबा फुले यांनी आपल्या लेखणीतून व सामाजिक चळवळीद्वारे बंड ठोकले. जोतिरावांची व तथागत बुद्धांची प्रेरणा घेऊन युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ब्राह्मणी व्यवस्थेला व मनुशाहीला आव्हानच दिले.

Reviews
There are no reviews yet.