Description
पुणे येथील इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक आणि लेखक कै. माधव का. देशपांडे यांचा हां सेहेचाळीसावा ग्रंथ. या ग्रंथात त्यांनी संतांच्या आध्यात्मिक विचारांची आणि काही निवडक श्रद्धांची विज्ञानाच्या दुर्बिनीतून निर्भीड पहाणी केलेली आहे. येशू ख्रिस्त, शंकराचार्य, ज्ञानेश्वरादी संतांच्या नावाचा धाक न मानता तथापि अनादर न व्यक्त करता, त्यांनी निर्भयपणे आपली मते मांडली आहेत. या मतांना विख्यात शास्त्रज्ञ आणि विचारवंत अल्बर्ट आईन्स्टाईन, सर ऑर्थर कीथ, वेस्ट वे, बर्ट्रांड रसेल, सॉक्रेटीस, हेकेल, टॉमस पेन, गॉइट, मार्क ट्वेन, लिंक्लेअर लुई, सॉमरसेट मॉम, इमरसन, लिन यूटांग, जेम्स रॉबिन्सन, डॉ. क्याऱल, व्हीक्सन, जॉर्ज सान्तायन, हॉलीओक, सर लॉरेन्स कॉलिअर, चास्कल, मारी स्टोप्स, सिगमंड फ़्रोइड, डॉ. राधाकृष्णन, डीन इंग, बर्नर्ड शॉ, निववुड, रीड हैवलॉक एलिस, देकार्ते, दिदेशे, टी. एच हक्सलि, एडिंग्टन, ज्यूलियन हक्सलि आणि टॉमस एडिसन यांचा कसा जबरदस्त पाठिंबा आहे ते त्यांची वचने उद्धृत करून पुराव्यानिशी निर्विवाद सिद्ध करून दिल्याने प्रा. देशपांडे यांच्या मताचे मोल अधिकच वाढले आहे.
विज्ञानाच्या भेदक नजरेतून संत वाङ्मय आणि आत्मा, अमरत्व, ब्रह्म, क्षर-अक्षर साक्षात्कार या विषयांची करून दिलेली ही ओळख आहे.
Reviews
There are no reviews yet.