Description
शेतकरी बंधूंनो, सध्या शेती सुधारण्यासाठी पुष्कळ प्रयत्न होत आहेत, शेती कशी करावी याबद्दल बोलणारे लिहिणारे उदंड झाले आहेत. शेती तदन्यांचे आणि सल्लागारांचे पिक जोमाने वाढत आहे मात्र शेतातील उत्पन्न दिवसेंदिवस खुरटतच आहे. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, उन्नत शेती, योगिक शेती, आशा अनेक पद्धतींचा गाजावाजा होत आहे. अनेक पद्धती आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे सामान्य शेतकरी भांबवला आहे. हातचे सोडून पळत्याच्या मांगे किती धावायचे हे त्यांना कळत नाही आणि कळले तरी वळत नाही. अशी स्थिति झाली आहे. शेतीच्या अनेक पद्धती आहेत. प्र्त्येकीत काहीना काही उणिवाही आहेत, त्याची जाण ठेवून प्र्त्येकीतील सार निवडून, आपले अनुभव आणि कौशल्य यांचा मेळ घालता आला तरच आपली शेती लाभदाई होईल. प्रत्येकाने, गटागटाने आपापली पद्धत विकसित आणि प्रत्यक्षात करायला हवी. विकल तेच पिकेल असा आग्रह धरण्याबरोबर पिकेल तेही विकेल असा जोडमंत्र साधायला शिकले पाहिजे आणि त्यासाठी “सुलभ शेती” हे पुस्तक वाचले पाहिजे आणि आपली भूमि सुजलाम सुफलाम केली पाहिजे.
शेतकरी दादा तुला रं भिती कशाची, भिती कुणाची,
तू टाक पुढं पाऊल, तुला दिसेल वाट यशाची
अन साथ हवी तुला, ” सुलभ शेतीची” , अर सुलभ शेतीची
– भीमराज भुजबळ
Reviews
There are no reviews yet.