Description
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १५ जानेवारी १९७७ साली करण्यात आली. मुंबई शहरातील सर्व बाजारपेठांचे स्थलांतर १९ फेब्रुवारी १९९६ पर्यंत पूर्ण झाले. या सर्व घटनांचे साक्षीदार श्री. राजेंद्र वसंतराव रासकर हे आहेत. त्यामुळे या कायद्यातील जमेच्या बाजू व त्रुटीच्या बाजू याचाही त्यांचा अभ्यास आहे. बाजार समितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या व आवश्यक अशा इतरही घटकांचा उल्लेख ‘जुन्नर तालुका कृषी, पणन मंत्र व तंत्र’ या पुस्तकात आहे. शेतमालाची चढउतार करणारे माथाडी कामगार यांचे बोर्ड व सुरक्षित कामगारांना संरक्षण देण्याचा कायदा या साऱ्या गोष्टांचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला.
श्री. राजेंद्र वसंतराव रासकर यांनी वडिलोपार्जित भाजी विक्री व्यवसाय केला. शेतमाल प्रामुख्याने नाशवंत भाजीपाल्याचा व कांदा बटाटयाचा व्रिकी वितरणाच्या साखळीमधील समाविष्ट असलेल्या प्रत्येक स्तरावरचा त्यांचा शेतमाल प्रामुख्याने उत्पादक ते ग्राहक स्तरावरील त्याच्या स्वतःच्या सहभागातुन आलेल्या अनुभवाच्या चिकित्सकवृत्तीने केलेल्या अभ्यासातुन शेतमालास उत्पादन खर्च + 20% नफा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची शेतमालास हमीभाव संरक्षक देण्याऱ्या व्यवस्थेची संकल्पना आहे. ही देशातील, राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यास प्रेरणादायी आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी योग्य ठरेल.
राजेंद्र वसंतराव रासकर
(कृषी पणन अभ्यासक व शेतकरी )
मो. ९८२०४3०३७६
Reviews
There are no reviews yet.