Description
जुन्नर ही शिवजन्माने पुनित झालेली ऐतिहासिक भूमी आहेच, पण शेती आणि शेती पद्धतीचे विविध प्रयोग या भागात पूर्वीपासून होत आले आहेत. आणि ते आधुनिक काळातही सुरू आहेत. डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन यांनीही एकोनिसाव्या शतकात या परिसरात ऑलिव्ह , सागवान, मलबेरी, कॉफी, साबूदाणा या लागवडी बरोबरच अक्रोड, द्राक्षे, कडू काकडी, बटाटा, कोबी, भोरसाळ, आरारूट अशा विविध पिकांच्या लागवडीचे प्रयोग शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात केले होते. हिवरे येथील त्यांचे निवासस्थान व परिसर हे तर शेती क्षेत्रातील खुल्या प्रयोगशाळा आणि विस्तारण केंद्रच होते.
या अगोदर औरंगजेबाच्या काळातही या परिसरातील आंबा हां दरबारामध्ये पोहोचवण्यासाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात आल्याचे पुरावे इतिहासात नोंद आहेत. आजही या भागातील आंबा “शिवनेरी हापूस” या नावाने मुंबई बाजारपेठेमध्ये आपले वेगळे स्थान टिकवून आहे. या आंबा उत्पादनासाठी पोषक सूक्ष्म हवामान या परिसरामध्ये असल्यामुळेच वर्षानुवर्ष विशिष्ट चव तसेच दर्जा टिकून आहे. या आंबा उत्पादनाला आधुनिक तंत्रद्न्यानाची जोड़ मिळावी व शेतकऱ्याच्या उत्प्ननात भर पडावी, या उद्देशाने शास्त्रशुद्ध तंत्रदन्यानस्नेही , आधुनिक लागवड पद्धतीचा अभ्यास पूर्वक आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरावे म्हणून या मार्गदर्शिकेचे प्रयोजन आहे.
यामध्ये जमीन , विविध आंबा जाती, कनोपी मॅनेजमेंट, अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग किडींचे एकात्मिक व्यवस्थापन, सेंद्रिय उत्पादन पद्धती फळगळ, काढणी, हाताळणी, विक्री, निर्यातक्षम उत्पादन या विविध घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना भविष्यात या पिकाबद्दल चांगले मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे. उत्पादन वाढीबरोबरच फळाचा दर्जाही उत्तम राहावा यासाठी कृषी विद्न्यान केंद्राची सर्व शास्त्रद्न्य टीम नेहमीच प्रयत्नशील असते आणि ही “आंबा उत्पादन मार्गदर्शिका’ त्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.
Reviews
There are no reviews yet.