Description
“कायदा आणि न्यायालयीन पत्रकारिता” हे पत्रकारितेमधील एक विशेष प्राविण्याचे दालन आहे. कायदा आणि पत्रकारिता या दोन व्यावसायिक ज्ञानांच्या परिपूर्ण मिलाफानेच हे प्राविण्य आत्मसात होऊ शकते. याचे शिक्षण कोणत्याही पाठ्यक्रमात दिले जात नाही. या दोन्ही विषयांचे औपचारिक शिक्षण न घेता, ज्यांनी सलग चार दशकांच्या निग्रही आणि स्वाध्यायी परिश्रमाने हे प्राविण्य मिळवून, केवळ मराठीच नव्हे तर एकूणच भाषिक पत्रकारितेत या विशेष शाखेची मुहूर्तमेढ रोवली त्या श्री. अजित गोगटे यांनी नव्या पिढीच्या मार्गदर्शनासाठी केलेले हे आत्मकथन. या विषयावरील मराठीमधील बहुधा हे पहिलेच पुस्तक ठरेल.
Reviews
There are no reviews yet.